Lonavala : मटका अड्ड्यावर छापा; दहा जणांवर गुन्हा दाखल

Raids on Matka hideouts; Ten people have been Filed a crime : त्यांच्याकडून मटका खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम असा 46 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर पोलीसांनी येथील बाजारभागातील बेकायदेशिरपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून मटका खेळणारे व खेळविणारे अशा दहा जणांवर गुन्हा दाखल केला. छाप्याची चाहूल लागताच मटका चालविणाऱ्या दोन जणांनी घटनास्थळावरून पलायन केले. तर उर्वरित आठ जणांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस हवालदार जयराज पाटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुसा पठाण व कादर इनामदार (दोघेही रा. भांगरवाडी लोणावळा), गणेश सिनकर (रा. देवघर ता.मावळ), रवि सेहगल (रा. हनुमान टेकडी लोणावळा), अदिल मुजावर (रा. इंद्रायणीनगर लोणावळा), पप्पु पवार (रा. हनुमान टेकडी पोर्टल चाळ लोणावळा), सुरेश मानकर (रा. कुणेगाव, ता. मावळ), निल कदम (रा. हनुमान टेकडी लोणावळा), प्रकाश डोंगरे (रा. देवले ता.मावळ), रमेश लोणकर (रा. हनुमान टेकडी, लोणावळा) या दहा जणांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्यांच्याकडून मटका खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम असा 46 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांना खबर्‍या मार्फत माहिती मिळाली की, निलकमल थिएटर शेजारी एका खोलीत कल्याण मटका खेळविला जात आहे.

या माहितीच्या आधारे लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. गायकवाड, पोलीस काॅन्स्टेबल एस. एम. वाडेकर, एस. डी. शिंदे, एस. एस. डोईफोडे, व्हि. एच. शिंदे यांच्या पथकाने छापा मारत कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम.एस.गायकवाड पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.