Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाचा जोर कायम; 24 तासात 130 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज : लोणावळा शहरात (Lonavala Rain) सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे लोणावळ्यात 130 मिमी (5.12 इंच) इतकी पावसाची नोंद झाली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस पडत आहे. आतापर्यंत लोणावळ्यात 3190 मिमी (125.59 इंच) इतकी पावसाची नोंद झाली आहे. तर, मागील वर्षी 3367 मिमी (132.56 इंच) इतका पाऊस पडला होता.

गेल्या वर्षी पडलेल्या कमी पावसाने यंदा उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या प्रारंभी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. पण, यंदाचा पाऊस सुखावणारा आहे.

हवामान खात्याने (Lonavala Rain) दिलेल्या अंदाजानुसार 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत घाट भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी झाड पडणे, पाणी साठणे अशा घटना घडत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरात पावसाने जोर धरून एक आठवडा विश्रांती घेतली होती. आता पुन्हा तो जोरदार बरसू लागला आहे.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा सपाटा, 399 फाईल्सचा निपटारा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.