Lonavala : आंतरमहाविद्यालयीन व्हाॅलीबाॅल स्पर्धेत राजमाता जिजाऊ संघ विजयी

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नि. बा. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स व पुणे जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 93 संघांनी सहभाग घेतला होता.

कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तीन दिवस हे सामने सुरू होते. स्पर्धेतील अंतिम सामना टीसी कॉलेजविरुद्ध राजमाता जिजाऊ महाविद्यालय भोसरी यांच्यामध्ये खेळवण्यात आला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात जिजाऊ महाविद्यालय संघाने विजयावर आपले नाव कोरले तर टीसी कॉलेज संघ उपविजेता ठरला. नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई व पुणे जिल्हा क्रीडा समितीचे सचिव डॉक्टर किशोर पाठारे यांच्या हस्ते जिजाऊ महाविद्यालयाला फिरता करंडक प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.