BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला विजेतेपद

प्रतिभा कॉलेज चिंचवड उपविजेते

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांनी विजेतेपद तर प्रतिभा कॉलेज चिंचवड यांनी उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून 40 संघांनी सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस आणि निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाने संयुक्तरित्या आयोजित केली. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून 40 संघांनी सहभाग घेतला. सहभागी संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापक यांच्या जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था सिंहगड संकुल लोणावळा मध्ये करण्यात आली होती.

या स्पर्धेचे उद्घाटन संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सिंहगड फार्मसी, कॉमर्स, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट आणि बी.एड. कॉलेजचे प्राचार्य, पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ. गिरीश धमाले यांची उपस्थिती होती. प्राथमिक फेरीतील सामने १२ व १५ ओव्हर्सचे घेण्यात आले. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स लोणावळा यांचे प्राचार्य डॉ. मोरेश्वर महाजन आणि पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ. गिरीश ढमाले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like