Lonavala : अदिवासी भागामधील नागरिकांना रेशनिंग कार्ड, विविध दाखले, स्वेटर व शालेय वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- लोणावळ्याजवळील ठाकरवाडी, पांगळोली या अदिवासी भागामध्ये राहणारे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यांना शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मावळ, वडगाव मावळ बार असोसिएशन व मावळ तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिरात शनिवारी (दि. 23) प्रथमच रेशनिंग कार्ड तसेच विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करण्यात आली. तसेच मुलांना स्वेटर व शालेय उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. बुरांडे साहेब, आर. के. गायकवाड, पी. एम. सुर्यवंशी, नायब तहसीलदार चाटे, अध्यक्ष अॅड. तुकाराम काटे, अॅड. निलिमा खिरे, अॅड. एल. एम. कौशल, अॅड. रंजना भोसले, अॅड अर्चना ढोरे यांनी कायद्याने दिलेल्या हक्कांचा वापर करा, स्त्री-पुरुष समानता राखा, कायद्याचा दुर उपयोग करु नका असे कायदेविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी अॅड. संजय वांद्रे, सुरेंद्र दाभाडे, अॅड. नागेश साहेब, अॅड राजेंद्र गाडेपाटील, अॅड. प्रताप शेलार, अॅड. चेतन जाधव, अॅड. संजय शिंदे, अॅड. मल्हारी शिंदे, अॅड. देवमोरे साहेब, अॅड. अविनाश पवार अॅड. साधना कुलकर्णी, अॅड. जयश्री शितोळे, वडगाव मावळ बार असोसिएशनचे सर्व वकील सभासद तसेच सरपंच सारिका खांडेभरड, उपसरपंच दत्ताभाऊ खांडेभरड व सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. महेंद्र खांदवे यांनी केले व आभार राकेश चांदोरकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.