Lonavala: लोणावळ्यात मागील 24 तासांत 162 मिमी पाऊस, संततधार कायम

Lonavala receives 162 mm of rainfall in last 24 hours जून महिन्यात सुरुवात झालेल्या पावसाला जून व जुलै महिन्यात पुरेसा जोर न मिळाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते.

एमपीसी न्यूज- सोमवारी (दि.5) रात्रीपासून लोणावळा शहरात सुरू झालेल्या पावसाची संततधार आज देखील कायम आहे. मागील 24 तासांत लोणावळा शहरात 162 मिमी तर दोन दिवसांत 357 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यात सुरुवात झालेल्या पावसाला जून व जुलै महिन्यात पुरेसा जोर न मिळाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. सोमवारपासून लोणावळा शहर व मावळ तालुक्यासह सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळा शहरात आज अखेरपर्यंत 1948 मिमी (76.69 इंच) एवढा पाऊस झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.