Lonavala News: लोणावळ्यात आजही पावसाचा जोर कायम, मागील 24 तासांत 157 मिमी पावसाची नोंद

Lonavala receives rainfall today, 157 mm of rainfall recorded in last 24 hours दुपारच्या सत्रात वारा व पाऊस जोरदार झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. रस्ते देखील मोकळे झाले होते.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मागील 24 तासांत 157 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.

लोणावळा शहर‍ात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने 24 तासांत 157 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात वारा व पाऊस जोरदार झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. रस्ते देखील मोकळे झाले होते.

शहरात आज (दि.13) सकाळी सात वाजेपर्यत यावर्षीचा एकूण 2514 मिमी (98.75 इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत 4983 मिमी (196.18 इंच) इतका पाऊस लोणावळ्यात झाला होता. पावसाचा जोर आज देखील कायम आहे.

पावसाच्या सरी कोसळत असल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. इंद्रायणी नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा भराव झाला असल्याने अनेक शेतांमध्ये तसेच मोकळ्या जागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.