Lonavala : ‘उच्च शिक्षणातील मूल्यांकन व मानांकन’ विषयावरील वेबिनारला प्रतिसाद

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त सर्वोत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी मूल्यांकन व मानांकन या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे पार पडले. या वेबिनार साठी उच्चशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत 525 लोकांनी टेलिग्राम, युट्युब व सिस्को वेबेक्स या प्लॅटफॉर्मचा वापर करत सहभाग नोंदविला.

पोखरण मधील अणुस्फोट 11 मे 1998 या दिवशी घडवून आणला. न्यूक्लियर क्षेपणास्त्र शक्तीचे परीक्षण पोखरण-2 म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा अणुस्फोट भारतामधील विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरले आहे. त्याचे स्मरण म्हणून 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाचे औचत्य साधून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड यांच्या सहकार्याने सर्वोत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी मूल्यांकन व मानांकन या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा व आर. एम. डी.सिंहगड, वारजे, पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले.

यामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये मूल्यांकन व मानांकन यामध्ये महाविद्यालयाचे समाजासाठीचे योगदान महत्वाचे असल्याचे नमूद करून परिषदेची भूमिका स्पष्ट केली. एम्पलोयाबिलिटी हा कळीचा मुद्दा असल्याचे सांगत ऑनलाईन शिक्षणाविषयी आपली मते व्यक्त केली.

डॉ. एम. एस. गायकवाड यांनी मूल्यांकन व मानांकन यांचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. पिसे, डॉ. मालखेडे, डॉ. खोडके, प्रा. डॉ. पी. एम. जोशी यांची महाविद्यालय विकास योजना, उद्दिष्टे व त्यासाठीची यंत्रणा उभी करणे, विकास आराखडा पालक व माजी विद्यार्थी यांचेसाठी जाहीर करणे या गोष्टी आवश्यक असल्याचे सांगितले.

दुपारच्या सत्रामध्ये डॉ. प्रकाश खोडके यांनी ब्लूमस् टॅक्सोनॉमी पद्धती, त्यातील टप्पे, अभ्यासक्रम निर्मिती, परीक्षा या विषयावर उद्बोधक व्याख्यान दिले. तसेच कोवीड-19 नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये विविध अमूलाग्र बदल अपेक्षित होणार आहेत तसेच अधिक सकारात्मक पद्धतीने या गोष्टी भारतासाठी घडू शकतात, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

या वेबिनार साठी उच्चशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत 525 लोकांनी टेलिग्राम, युट्युब व सिस्को वेबेक्स या प्लॅटफॉर्मचा वापर करत सहभाग नोंदविला. सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील 15 व्यक्तींच्या ऑनलाईन व्याख्याने व प्रेझेंटेशन्स झाली.

प्रा. डॉ. सुहास देशमुख यांनी होस्ट म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.