BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : रिपाइंच्या वतीने शहिद जवानांना श्रद्धांजली; पुकारलेल्या बंदला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं)च्या वतीने पुकारलेल्या लोणावळा बंदला शहरातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद ठेऊन पाठिंबा देण्यात आला.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हा बंद पुकारण्यात आला होता. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा यावेळी तिव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. विविध राजकिय पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवाजी चौकात एकत्र येत बंदला पाठिंबा दिला. तसेच भारत सरकारने पाकिस्तानच्या हा दहशतवादी संघटना नेस्तानाभूत कराव्यात, अशी मागणी केली.

  • साईबाबा रिक्षा संघटनेच्या वतीने निषेध
    रेल्वे स्थानकाबाहेर साईबाबा रिक्षा संघटनेच्या वतीने पुलवामा येथील घटनेचा निषेध नोंदवत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रेल्वे पोलीस फोर्सचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सिंह परिहार, पोलीस उपनिरीक्षक तोताराम मीना, राजकुमार यादव, गणेश साळुंके यांच्यासह रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
.