Lonavala : मावळ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी सचिन पारेख

कार्याध्यक्षपदी रमेश पाळेकर

एमपीसी न्यूज- मावळ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदावर सचिन पारेख यांची तर कार्याध्यक्ष पदावर रमेश पाळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

मावळ फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोणावळ्यात विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 26 जानेवारी रोजी जागो हिंदुस्तानी ह्या देशभक्तीपर गीते, आंतरशालेय नृत्य स्पर्धा तसेच सामाजिक व धार्मिक सलोख्याचे दर्शन घडविणार्‍या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान होणार्‍या या रॅलीत लोणावळा शहरातील सर्व शाळाचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख विनय विद्वांस यांनी दिली.

मावळ फाऊंडेशन कार्यकारणी

सचिन पारेख (अध्यक्ष), रमेश पाळेकर (कार्याध्यक्ष), बाळासाहेब फाटक (उपाध्यक्ष), विनय विद्वांस (कार्यक्रम प्रमुख), ज्ञानेश्वर येवले (सचिव), अमन पठाण (खजिनदार), संजय आडसुळे (निमंत्रक), श्रीधर पुजारी, नंदकुमार वाळंज, किरण गायकवाड, जितेंद्र बोत्रे, राजेंद्र चौहान, जितेंद्र कल्याणजी, नितिन आगरवाल, नवीन भुरट, रवी सलोजा, नासिर शेख (सल्लागार), संदीप वर्तक, भरत तिखे, सुबोध खंडेलवाल, बापुलाल तारे, मंगेश आगरवाल, हेमंत मुळे, आशिष बुटाला, बाबुभाई शेख, गणेश साबळे, गौरव लवाटे, कासम शेख, प्रगती साळवेकर, मनिषा बंबोरी (सदस्य)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.