Lonavala : ‘कोरोना’प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी बनविले ‘सॅनिटायझर मशीन’

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुसगाव ग्रामपंचायती मधील श्रमदाननगर येथे ग्रामपंचायत सदस्य सुरज केदारी यांच्या कल्पनेतून सॅनिटायझर मशिन बनविण्यात आले आहे.

श्रमदाननगरच्या प्रवेशद्वाराजवळ हे मशीन बसून येणाऱ्या प्रत्येकाने सॅनिटायझरने हात धुवावे, अशी व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक येणारी व्यक्ती व वाहन यांच्यावर सॅनिटायझर मशिनद्वारे फवारणी करत निर्जंतुकीकरण करून कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्याची खबरदारी घेतली जात आहे.

कुसगाव ग्रामपंचायत सदस्य सूरज केदारी यांनी दत्ता पडवळ, अमोल धोंगडे, राकेश कांबळे, तुषार साठे, समीर शेख, प्रमोद कारंजे, धवल पाटील, सुधीर सावरतकर, अनिल भालेराव यांच्या साथीने ‘कोरोना’ विषाणूचा वाढत फैलाव रोखण्यासाठी हे सॅनिटायझर मशिन बनविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.