Lonavala : सरजु भवानी किक्रेट सामन्यांना सुरुवात

एमपीसी न्यूज- बहुप्रतिष्ठीत सरजु भवानी किक्रेट सामन्यांना लोणावळ्यात रेल्वे ग्राउंडवर सुरुवात झाली. पुढील सोळा दिवस हे सामने होणार असून पुणे, रायगड व मुंबई विभागातील 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी. नायर यांच्या हस्ते या सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्युटचे सचिव मयूर पाडाळे, सूर्यप्रकाश, दिलीप पवार, बी.आर.चौधरी, विशाल गुरव, दशरथ कार्लेकर, शेखर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील पहिला सामना वीर भगतसिंग लोणावळा व महिंद्रा सानियो खोपोली यांच्यात झाला. यामध्ये भगतसिंग संघाने विजयश्री मिळवली.

या स्पर्धेत अरमान शेख याला सामनावीर घोषित करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, चंदू बोर्डे, कपिल देव यांच्यासारखे अनेक नामवंत किक्रेटपटू लोणावळ्यातील सरजु भवानी किक्रेट स्पर्धेत खेळलेले असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व असून सेंट्रल रेल्वेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.