Lonavala : ज्येष्ठ नागरिकांनी घेतला हास्यकवी संमेलनाचा आस्वाद

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकांना आनंदी व उत्साही ठेवण्याकरिता खास ज्येष्ठांकरिता हास्यकवी संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात करण्यात आले होते. ज्येष्ठांनी या संमेलनाचा मनमुराद आनंद घेत हास्याचा कल्लोळ केला.

ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा व मावळ वार्ता फाऊंडेशन लोणावळा यांनी या हास्यकवी संमेलनाचे आयोजन केले होते. खास ज्येष्ठांकरिता हास्यकवीता सादर करत त्यांना दोन तास कलाकारांनी खेळवून ठेवले. हास्यांच्या कल्लोळात ज्येष्ठ स्वतःचे वय व दुःख विसरुन समरस झाले होते. यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधत शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस यांनी ज्येष्ठ नागरिकांना संविधानाच्या प्रतीचे वाटप केले.

याप्रसंगी मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष जितुभाई टेलर, संजय आडसुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, नगरसेवक निखिल कविश्वर, भरत हारपुडे, बापुलाल तारे, राजेश मेहता, भांगरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कालेकर, लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे संघाचे पांडूरंग तिखे, पांडूरंग हार्डे, शंकरराव गुंड, अरविंद मेहता, गोरख चौधरी, धिरुभाई टेलर, अश्विनी धारप, मृदृला पाटील, सुशिला गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हास्यकवी अनंत कदम, किशोर टिळेकर, राजेश दिवटे, जयवंत पवार, गणेश पुंडे, बिबिशन पोटरे, राजेंद्र सगर यांनी हास्य कवितांमधून धम्माल उडवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.