BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : शिलाटणे गावाच्या रस्त्यावर बसविले पथदिवे

एमपीसी न्यूज- महामार्ग ते गाव दरम्यान असलेला काळोख दूर करण्याकरिता ग्रामपंचायत निधीमधून शिलाटणे ग्रामपंचायतीने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ते शिलाटणे पुनर्वसन या रस्त्यावर 15 पथदिवे बसविले आहेत.

पथदिव्यांच्या खांबाला नारळ वाढवून या रस्त्यावरील दिव्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके फाऊंडेशनचे संचालक सुधाकर शेळके, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, उद्योजक नारायण मालपोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, माजी सरपंच पोपटराव भानुसघरे, हेमंत भानुसघरे, ज्ञानदेव भानुसघरे, तानाजी भानुसघरे, भरत येवले, सरंपच गुलाब आहिरे, उपसरपंच निर्मला भानुसघरे, सदस्या कांचन भानुसघरे, मनीषा भानुसघरे, माधुरी भानुसघरे, अश्विनी भानुसघरे, संतोष भानुसघरे, संग्राम भानुसघरे, रामदास भानुसघरे, शिलाटणे गावातील सर्व पदाधिकारी,सदस्य सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या रस्त्यावर दिवे लागल्याने पहाटे कामानिमित्त जाणारा कामगार वर्ग तसेच रात्री उशिरा गावात येणारे ग्रामस्थ यांना काळोखातून न जाता दिव्याच्या लख्ख प्रकाशातून जाता येणार आहे. सदर पथ दिव्यांची ग्रामपंचायतीने देखभाल व दुरुस्ती देखील नियमित करावी तसेच गावाच्या इतर भागात देखील पथदिवे बसविल्यास गावाचा परिसर उजळून निघणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like