Lonavala : शिवसेनेकडून आदिवासी पाड्यातील कुटुंबांना रेशनिंग वाटप

एमपीसी न्यूज : शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा शहर व परिसरातील डोंगराळ भागातील आदिवासी पाड्यातील कातकरी, आदिवासी, ठाकर कुटुंबांना महिनाभराच्या रेशनिंगचे मोफत वाटप करण्यात आले.

शहर भागातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला जात असताना डोंगराळ भागात राहणारी आदिवासी कुटुंबिय मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा नागरिकांना हे धान्य वाटप करण्यात आले असल्याचे शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी सांगितले.

शहरप्रमुख फाटक यांच्यासह नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, कल्पना आखाडे, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार, तानाजी सुर्यवंशी, माजी विभागप्रमुख सुरेश टाकवे, विजय आखाडे, दत्ता थोरवे, रतन मराठे, भगवान देशमुख, दिलीप गायकवाड, दत्ता जांभुळकर, अशोक बोंद्रे, विनायक टाकवे, लखन खरात, सचिन ढाकोळ, भुषण मोहोळ, संतोष आखाडे, बाळासाहेब लोहिरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन हे धान्य वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.