Lonavala : शिवसेना लोणावळा शहरप्रमुखपदी बाळासाहेब फाटक यांनी निवड

एमपीसी न्यूज – शिवसेना लोणावळा शहरप्रमुखपदी भांगरवाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण फाटक यांची निवड करण्यात आली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते फाटक यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील ऊर्फ बाळा कदम, मावळ तालुका संपर्कप्रमुख गणेश जाधव यांनी सदरची निवड जाहिर केली. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, युवासेना विस्तारक वैभव थोरात, मावळ तालुकाप्रमुख राजु खांडभोर, समन्वयक शरद हुलावळे, जयवंत दळवी, सागर हुलावळे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब फाटक यांच्या रुपाने सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला, अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. लोणावळा शहरात शिवसेनेचे पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देणार आहे, असे फाटक यांनी सांगितले.

बाळासाहेब फाटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.