BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : खाणीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश

एमपीसी न्यूज – गुरं चारण्याकरिता रानात गेल्यानंतर खाणीत बुडालेल्या वळक ( मावळ) येथिल 19 वर्षीय युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या रेस्कू पथकाला यश आले आहे.

गणेश मारुती बांगर (वय 19, रा. वळक, ता. मावळ) असे या युवकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा 9 ऑक्टोबर 2019 रोजी गुरं चारण्याकरिता रानात गेला असता खाणींमध्ये बुडाला. या घटनेची माहिती शिवदुर्ग मित्रला समजल्यानंतर शिवदुर्गची टीम शोध कार्यासाठी दाखल झाली. मात्र, अंधार झाल्यामुळे शोध मोहीम अर्धवट थांबवण्यात आली.

याबाबत आज पुन्हा दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू केली असता काही वेळातच मृतदेह शोधून बाहेर काढला. या वेळी लोणावळा ग्रामीणचे पोलीस आणि आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.

शिवदुर्ग मित्रचे राहुल देशमुख, प्रणय अंबुरे, महेश म्हसने, विकास मावकर, अनुराग यादव, अनिल आंद्रे, करण आंद्रे, चंद्रकांत बोंबले, सागर कुंभार, शुभम आंद्रे, आकाश अंबुरे, सतिश मेलगडे, अशोक उंबरे, अशोक कुटे, राजेंद्र कडु, आनंद गावडे, सुनिल गायकवाड यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सतीश घारे , विकास भानुसघरे , नवनाथ बालगिरे ,अक्षय भानुसघरे, महेश गायकवाड, समीर जाधव हे मोहिमेत सहभागी झाले होते.

HB_POST_END_FTR-A2

.