BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : इंदिरानगर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

124
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बाजार विभागातील इंदिरानगर येथे आज शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शादान चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील काही वर्षापासून हा भाग भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. याठिकाणी शिवसेनेच्या या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख सुनील इंगूळकर, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, सुभाष डेनकर, महेश खराडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.