Lonavala : श्रीकांत होगले यांना वाणिज्य विभागाची पीएचडी

एमपीसी न्यूज – लोणावळा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्रीकांत सुधीर होगले यांना वाणिज्य विभागाची पीएचडी प्राप्त झाली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यालयातून त्यांनी अँन अँनालिटिकल स्टडी आँफ मँनेजमेंट आँफ फ्लोरिकल्चर इंडस्ट्री आँफ महाराष्ट्र या विषयावर संशोधन करत सदरची पदवी प्राप्त केली. होगले हे लोणावळा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करतात.

शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करताना त्यांनी मिळविलेली पीएचडी ही सर्वासाठी शैक्षणिक आदर्श निर्माण करणारी आहे. त्यांना ही पदवी मिळविण्याकरिता वेळोवेळी सहकार्य करणारे महाविद्यालयाचे अध्यक्ष व विश्वस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मार्गदर्शक या सर्वांमुळेच हे शक्य झाले असल्याचे होगले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like