BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : शहरात श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार दोघांचाही घरोघरी प्रचार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – निवडणूक लोकसभेची असली तरी पार्थ पवार यांच्या उमेदवारीने चुरशीचा बनलेला मावळ मतदारसंघ आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता भाजपाने सुरु केलेले कॅम्पेनिंग यामुळे स्थानिक निवडणुकीप्रमाणे लोणावळ्यात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला आहे.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची धुरा लोणावळ्यात भाजपने उचलली आहे. भाजपचे शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, शहराध्यक्ष सुनिल इंगूळकर यांनी शहरात रोज सायंकाळी प्रभागवार रॅली काढत घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचारपत्रके वाटप करण्यावर भर दिला आहे. युतीचा घटक पक्ष असलेली आरपीआय अजून मात्र प्रचारात सक्रिय झालेली नाही.

  • राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी रिपाइं महाआघाडीचे उमेदवार यांच्या प्रचाराकरिता देखील हिच रणनिती आखण्यात आली असून आघाडीतील घटक पक्ष रोज सायंकाळी एकत्र येत प्रभागवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मावळच्या विकासाकरिता पार्थ पवार हाच कसा योग्य उमेदवार आहे, हे पटवून दिले जात आहे. लोकसभेची निवडणूक असली तरी अटितटीच्या लढतीमुळे लोणावळ्यात युती आणि आघाडीचे कार्यकर्ते इर्षेला पेटले असून आपल्याच उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावी. याकरिता घरटी प्रचारावर भर दिला जात आहे.

HB_POST_END_FTR-A4

.