BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : सिंहगड महाविद्यालयात सिंहगड करंडक टेक्निकल फेस्टिवल साजरा

0

एमपीसी न्यूज- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमध्ये सिंहगड करंडक टेक्निकल फेस्टिवल टेक्टॉनिक 2020 हा राष्ट्रीय कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आव्हान व नावीन्यपूर्ण संकल्पनाना वाव मिळावा म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रा. मारुती नवले यांनी आठ वर्षांपूर्वी या उत्सवास सुरुवात केली. या फेस्टिवलमध्ये एकूण 391 विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये 16 थीम इव्हेंट्स, 191 कॉम्पिटिशन, 53 कार्यशाळा, 36 सेमिनार्स, 103 चिल झोन्स आयोजित करण्यात आले होते. देशभरातील एकूण शंभर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एम.सी.ए., तंत्रनिकेतन यामधील 20 हजार विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. यामध्ये सहा लाखांची एकूण बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वडगाव येथील सिंहगड संकुलात पार पडला.

यामध्ये विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी हॅकर्स इराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास चौधरी, टेक्टॉनिक डायरेक्टर डॉ. के.आर.बोरोले, डॉ.एम.एस.रोहोकले, डॉ जे.डी.देसाई , डॉ के. पी. पाटील, डॉ. एम. एस. गायकवाड, डॉ.एस .डी. मार्कंडे, डॉ. चंद्राणी सिंग, डॉ. के. एन. गुजर, डॉ. एस .डी. सावंत व सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, डायरेक्टर इव्हेंट कॉर्डिनेटर, स्टुडंट कॉर्डिनेटर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा रचना नवले अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित नवले यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like