Lonavala: सिंहगड महाविद्यालयात माजी विद्यार्थी हरवले ‘नॉस्टल्जीया’त!

एमपीसी न्यूज – सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कुसगाव बुद्रुक लोणावळा येथे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा “नॉस्टल्जीया” साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रा. हितेश मुजुमदार व प्रा. शिल्पा ब्रेंजर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आयेशा सिद्दीकी यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाची संकल्पना मांडली. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यात महाविद्यालय संदर्भात जुन्या आठवणी व्यवसायिक प्रवास आणि सद्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांकरिता मनोरंजनासाठी डंबशेरेट्स,  ट्रेजर हंट आणि बॉक्स क्रिकेट अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या डॉ. आयेशा सिद्दीकी यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.