Lonavala : मोहन कडू यांचे निधन

एमपीसी न्यूज- गवळीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते व श्रीराम क्रीडा मंडळाच्या ढोल-लेझिम पथकातील ज्येष्ठ ढोलवादक मोहन शंकर कडू (वय 58) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व कन्या असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर लोणावळा येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गवळीवाडा परिसरातील ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.