BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : खंडाळा घाटातील धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरु

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगदा भागातील सैल झालेल्या दरडी पाडण्याचे काम दगड आजपासून सुरु करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी साडेतीन दरम्यान पंधरा मिनिटाचे पाच ब्लाॅक घेत हे काम करण्यात आले.

या ब्लाॅक दरम्यान मुंबई आणि पुणे या दोन्ही मार्गीकांवरील वाहतुक थांबविण्यात आली होती. 20 मार्चपर्यंत हे ब्लाॅक घेण्यात येणार आहेत. या दरम्यान येणार्‍या शनिवार आणि रविवारी मात्र वाहतूक सुरु राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी (10 ते 10.15), (11 ते 11.15), (12 ते 12.15), दुपारी (2 ते 2.15) व (3 ते 3.15) या वेळेत वाहतूक पुर्णतः बंद राहणार आहे.

  • द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार्‍या नागरिकांनी आणि प्रवाशांनी ब्लाॅक दरम्यान गैरसोय टाळण्याकरिता वेळेचे नियोजन करुन प्रवास करावा अथवा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3