BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ पुन्हा दरड कोसळली; मिडल व डाऊन लाईन बंद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल याठिकाणी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल आणि डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे किलोमीटर 115 जवळ ही घटना घडली. पुण्याच्या दिशेने होणारी रेल्वे वाहतूक सेवा ठप्प आहे. तर, मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु आहे.

लोणावळा आणि खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोराचा पाऊस सुरु आहे. पावसामुळे दुपारी दोनच्या सुमारास मंकी हिलजवळ लहान स्वरुपाची दरड कोसळली. माती आणि दगड बाजूला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली.

  • यावेळी काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु असून तदनंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान, पुण्याकडे सर्व रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत.

HB_POST_END_FTR-A1
.