Lonavala : कुरवंडेत अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : कुरवंडे गावातील ओढ्यालगतच्या झाडाला गळफास घेऊन एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. कुरवंडे गावचे पोलीस पाटील प्रीतम ससाने यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरवंडे गावातील ओढ्यालगत एका उंबराच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन 50 ते 55 वय असलेल्या अनोळखी इसमाने आत्महत्या केली आहे. रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघड झाली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मृत व्यक्ती अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पँन्ट असून ते अंगाने सडपातळ आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार जयराज पाटणकर पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.