Lonavala : एमआयडीसीला जागा देण्यास ताजे, पिंपळोली ग्रामस्थांचा विरोध; शेतकऱ्यांना बाजू मांडण्यासाठी 26 ऑगस्टपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून ताजे, पिंपळोली, बोरज, टाकवे खुर्द या गावातील शेतक-यांची शेतजमीन संपादन प्रक्रिया सुरु झाली असून याच्या विरोधात पिंपळोली ताजे बोरज येथिल ग्रामस्थांनी सर्वांमते जमीन देण्यास तिव्र विरोध दर्शवला आहे. याबाबतच्या नोटीसा शेतकर्‍यांना नुकत्याच मिळाल्या असून आपली बाजू मांडण्याकरिता 26 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ताजे पिंपळोली गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी पूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेससाठी आणि डंपिंगसाठी संपादित करण्यात आल्याने येथील शेतकरी अल्पभूधारक आणि भूमिहीन झाले आहेत. त्यातच आता दुसरे संकट एमआयडीसीच्या रुपाने समोर राहिल्याने शेतकरी पूर्ण घाबरून गेले आहेत.

  • या गावांत गट क्रमांक 1 ते 9 वगळता संपूर्ण क्षेत्र संपादित केले जाणार असून यामध्ये गावठाण व निवासी क्षेत्राचा देखील समावेश करण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली गावच्या गाव गिळंकृत करण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

भूसंपादनाला विरोध करण्याकरिता आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते सुननील गुर्जर, संजय गांधी निराधार योजनेचे संचालक मच्छिंद्र केदारी, पोलीस पाटील अरुण केदारी, संदीप बोंबले, सुभाष पिंपळे, संभाजी केदारी आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत केदारी म्हणाले, भूसंपादनास आमचा विरोध आहे. या भूसंपादनास विरोध करत पुढील काही दिवसात मोठे आंदोलन करत एमआयडीसी येथून हटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

  • यावेळी ताजे पिंपळोली येथील शेतकरी गणपत केदारी, विष्णू बोंबले शिवाजी केदारी, दत्तात्रय केदारी, गणेश केदारी, पांडूरंग बोंबले, रुपचंद गायकवाड, संदिप चौरे, संतोष बोंबले, बाबाजी केदारी, बाळासाहेब सुतार, अतू बोंबले, बाळू पिंपळे, पांडूरंग ढमाले, भरत केदारी, भाऊसाहेब केदारी, राजू पिंपळे, भगवान बोंबले यांच्यासह 100 ते 150 शेतकरी उपस्थित होते.

एमआयडीसीच्या पहिल्या टप्यात टाकवे खुर्द, ताजे व बोरज येथील पाचशे एकर क्षेत्र तर दुसऱ्या टप्प्यात ताजे पिंपळोली येथील बागयती क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. याबाबतच्या नोटीसा शेतकर्‍यांना नुकत्याच मिळाल्या असून आपली बाजू मांडण्याकरिता 26 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.