Lonavala : पक्षपातीपणा न करता सरसकट अतिक्रमण कारवाई करा

शिवसेनेच्या लोणावळा शहर शाखेची मागणी

एमपीसी न्यूज – अतिक्रमण कारवाई करताना पक्षपातीपणा न करता सरसकट कारवाई व्हावी. तसेच शिवसेना नगरसेविका आणि शाखाप्रमुख यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणी करिता मंगळवारी (दि.४) लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव, मावळ तालुकाप्रमुख राजु खांडभोरे, उपतालुकाप्रमुख गबळू ठोंबरे, पुणे जिल्हा महिला संघटक व नगरसेविका शादान चौधरी, लोणावळा शहरप्रमुख नगरसेवक सुनिल इंगूळकर, नगरसेवक शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, संघटक बाळासाहेब फाटक, मावळ विद्यार्थी आघाडीप्रमुख धनंजय नवघणे, युवती प्रमुख दीपाली भिल्लारे, उपशहरप्रमुख मनिषा भांगरे, संजय भोईर, मनिष पवार, श्याम सुतार, महेश खराडे, सुभाष डेनकर, भगवान देशमुख, भरत हुलावळे, रज्जाक मण्यार, राकेश कालेकर, विजय आखाडे, अमोल परदेशी याच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.

  • यावेळी बोलताना गजानन चिंचवडे आणि शादान चौधरी म्हणाल्या, लोणावळा शहरात सध्या जी अतिक्रमण कारवाई सुरु आहे. ती पक्षपातीपणे सुरु असून केवळ गरिबांच्या टपर्‍य‍ांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये देखील ठराविक लोकांना टार्गेट केले जाते. अतिक्रमण कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र, ती करत असताना प्रशासनाने श्रीमंत व गरिब असा भेदभाव न करता ती सरसकट करावी, धनिकांवर पहिली कारवाई करा गोरगरिब स्वतःहून त्यांची अतिक्रमणे काढून घेतील. तसेच अतिक्रमण कारवाईच्या ठिकाणी गेलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका सिंधू परदेशी व शाखाप्रमुख मोहन मल्ला यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा साखळी उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.