Lonavala : ज्युनियर नॅशनल इक्वीस्टेरियन स्पर्धेत ‘तन्मय वांद्रे’ला रौप्य पदक

एमपीसी न्यूज – अँबीसी इंटरनॅशनल रायडिंग स्कूल बैंगलोर येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल इक्वीस्टेरियन चँम्पीयनशिप 2019 या स्पर्धेत लोणावळ्यातील तन्मय संजय वांद्रे याने 14 वर्षाखालील गटात वैयक्तिक रौप्य पदक मिळविले तर, सांघिक सुर्वण पदक मिळविले. या स्पर्धेत अँबीसी इंटरनॅशनल रायडिंग स्कूल बैंगलोरचा शशांक कुणुमुरी यांने प्रथम तर, एहसास मदन याने कांस्य पदक मिळविले.

पांगोळी गावात राहणारा तन्मय हा उस्मान लकडावाला यांच्या राईड टू लिव्ह अँकेडमीमध्ये हाॅर्स रायडिंगचे प्रशिक्षण घेत असून एशियन सुर्वण पदक विजेते कर्नल जी.एम.खान, आंतरराष्ट्रीय खेळाडू आशिष लिमये व के.व्हि.सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रायडिंगची तयारी करत आहे.

तळेगाव येथील जेपीलूप या संस्थेचे रोहन मोरे यांनी स्पर्धेकरिता तन्मयला विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तन्मय हा लोणावळ्यातील कैवल्यधाम विद्या निकेतन शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.