Lonavala : मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता ठाकर समाजाचा मोर्चा

एमपीसी न्यूज- खंडाळा तलावाच्या शेजारी असलेल्या ठाकर वस्तीतील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता मोर्चा काढत लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले.

खंडाळा तलावाच्या शेजारी ठाकर वस्ती आहे. या वस्तीला पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, शाळेची इमारत या प्राथमिक गरजा योग्यरितीने पुरविल्या जात नाहीत. नगरपरिषद कर्मचारी अव्यवहारी वागतात त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, पर्यटन विकासाच्या नावाखाली आदिवासींना निर्वासित करण्याचे षडयंत्र थांबवा या मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात आला.

आदिवासी भटका बहुजन संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, माजी नगराध्यक्ष आर.डी.जाधव, वंचित बहुजन आघाडीचे रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मनीष माडे, अंकूश माडे, शंकर माडे, अनिता वाघमारे, योगेश ढुमणे, सुरेखा माडे, भावेश बल्ला यांच्यासह ठाकर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.