Lonavala : सराफा दुकानातून एक किलो चांदी लंपास करणारा कारागीर अखेर जेरबंद

The artisan who Thieves a one kilo silver from a bullion shop was finally arrested : लोणावळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आज त्याला अटक केली.

एमपीसीन्यूज : लोणावळ्यातील धनलक्ष्मी ज्वेलर्सच्या मालकास फसवून एक किलो चांदी लंपास करणाऱ्या कारागिराला जेरबंद करण्यास लोणावळा शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकास यश आहे.

रामेश्वर गणेशराव कुलथे (वय 36, रा.वलवण, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या कारागिराचे नाव आहे. डिसेंबर 2019 पासून तो आरोपी फरार होता.

धनलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातील एक किलो वजनाची चांदीची पिंड पुण्याला जाऊन पॉलिश करून आणतो, असे सांगून कारागीर रामेश्वर कुलथे डिसेंबर 2019 मध्ये पसार झाला होता.

तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर लोणावळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आज त्याला अटक केली.

पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस काँन्स्टेबल अजीज मेस्त्री, मनोज मोरे, पवन कराड, राजेंद्र मदने यांनी ही कारवाई केली.

पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.