Lonavala : ‘शहर भाजप’कडून एक हजार गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर (मंडळ) च्या वतीने शहरातील एक हजार गरिब कुटुंबांना घरपोच अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. इंद्रायणीनगर येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. गर्दी टाळण्याकरिता सर्व नागरिकांना कूपन वाटप करण्यात आली होती तसेच धान्य घेण्याकरिता येताना दोन नागरिकांमध्ये पाच फुटांचे अंतर राहील, असे उभे राहण्याकरिता गोल तयार करण्यात आले होते.

कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आल्याने हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वसामान्य व गोरगरिब कुटुंबातील नागरिकांची अन्नधान्यावाचून होणारी गैरसोय टाळण्याकरिता लोणावळा शहर भाजपा मंडलने हा मदतीचा हात दिला असून अनेक सामाजिक संघटना व संस्था यांनी सढळ हाताने या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे.

_MPC_DIR_MPU_II

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मंडल अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, नगरसेवक ब्रिंदा गणात्रा, देविदास कडू, बाळासाहेब जाधव, अनिस गणात्रा आदीच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले.

गोरगरिबांना जेवण वाटप
शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने गोरगरिबांना जेवणाची पाकिटे वाटप करण्यात आली तसेच मुस्लीम समाजाकडून लोणावळा शहरात विविध ठिकाणीच्या गोरगरिबांना जेवण वाटप केले जात आहे. शहरातील काही युव तरुणांनी एकत्र येत शहरात दोन हजार नागरिकांना महिनाभर पुरेल असे अन्नधान्य व भाजीपाला किट तयार केले असून पुढील दोन दिवसात त्याचे घरपोच वाटप सुरु करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.