Lonavala : शहरात 31 ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये : The city bans senior citizens from going to public places until August 31st

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात 31ऑगस्ट पर्यत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिली.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा शहरातील सर्व विभागात वेगवेगळ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी एक सुसज्ज अशी व्हॅन फिरणार आहे. ज्यात ज्येष्ठ नागरिकांचे छातीचे एक्सरे, ईसीजी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

याचा फायदा सर्वांना होणार असून ही व्हॅन कोणत्या विभागात कधी असेल यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व ज्येष्ठांनी घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी पवार यांनी केले आहे.

तसेच 15 ऑगस्टपासून लोणावळा शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर (DCHC) सुरू होणार असल्याची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.