Lonavala : शहराचा दहावीचा निकाल 98.35 टक्के

Lonavala: The city's tenth result is 98.35 percent : दहा शाळांचे शंभर नंबरी यश

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी शालांत परिक्षेत लोणावळा शहराचा निकाल 98.35 टक्के लागला.

शहरातील 1336 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती, यापैकी 1314 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लोणावळा विभागातील 20 शाळांपैकी दहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला तर उर्वरित शाळांचा निकाल देखील सरासरी 90 टक्के लागला.

लोणावळा शहरातील रायवुड येथील आँक्झिलियम काॅन्व्हेंट, तुंगार्ली येथील डाॅन बाॅस्को, भांगरवाडीतील अँड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल, डीसी हायस्कूल खंडाळा, कार्ला येथील एकविरा विद्या मंदिर, तुंग येथील तुंग माध्यमिक विद्यालय, शांतीसदन स्कूल रायवुड, लोणावळा नगरपरिषद उर्द माध्यमिक शाळा, कुरवंडे गावातील सोजर माध्यमिक व तुंगार्ली येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमिक या दहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

लोणावळा शहरातील मोठी शाळा असलेल्या व्हिपीएस शाळेचा निकाल 98.51 टक्के, डाॅ. बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाचा निकाल 99.10 टक्के, शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय, मळवली 98.42 टक्के, गुरुकुल मराठी माध्यमिक शाळा 97.75 टक्के, लोणावळा नगरपरिषद खंडाळा माध्यमिक 96.42 टक्के, लोणावळा नगरपरिषद लोणावळा माध्यमिक 87.50 टक्के, स्व. वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय 90.90 टक्के, आंतरभारती बालग्राम शाळा 95.45 टक्के, नागनाथ माध्यमिक विद्यालय 76 टक्के, आँल सेंट चर्च शाळा 94.11 टक्के इतका लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.