Lonavala : निसर्गाच्या तडाख्याने शहराच्या निम्म्या भागासह ग्रामीण परिसर 72 तासांपासून अंधारात

The countryside, including half of the city, has been in darkness for 72 hours due to the impact of nisarga

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्री वादळाने महावितरण कंपनीचे तब्बल दोनशे खांब पडल्याने निम्म्या लोणावळा शहरासह ग्रामीण परिसर मागील 72 तासांपासून अंधारात आहे. सध्या निम्म्या लोणावळ्यात वीज पुरवठा सुरु झाला असून उर्वरित भागात वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी 30 अतिरिक्त कामागारांची टिम मागविण्यात आली असल्याची माहिती महावितरणचे लोणावळा उपविभागीय अभियंता उमेश चव्हाण यांनी दिली.

निसर्ग वादळाने लोणावळा शहरासह कुसगाव व कार्ला परिसरात 20 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळात उच्च दाब व लघुदाब वाहिनीचे दोनशे खांब पडले, चाळीस खांब वाकले तर पाचशेहून अधिक ठिकाणी वीज वाहक तारा तुटल्या, आठ ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले.

ऐवढ्या मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. दोन दिवसात महावितरण कंपनीने शहरात पाणी पुरवठा करणार्‍या सर्व लाईन सुरू केल्या आहेत.

ज्या भागात कमी नुकसान झाले आहे अशा भांगरवाडी, बाजारपेठ, वलवण, नांगरगाव, समतानगर, खंडाळा, जुना खंडाळा, हनुमान टेकडी, आयएनएस शिवाजी, कुसगाव, वाकसई व कार्ला येथिल काही भागात वीज पुरवठा सुरू झाला आहे.

तर तुंगार्ली, न्यु तुंगार्ली, भुशी, रामनगर, रायवुडचा काही भाग, रेल्वे विभाग, पांगोळी व ग्रामीण भागातील पंधरा ते सोळा गावांचा वीज पुरवठा आजुनही खंडित आहे.

लवकरात लवकर सर्व भागात वीज पुरवठा सुरळित करण्याकरिता महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

तसेच कोणत्या भागात विजेचे खांब अथवा तारा पडलेल्या असल्यास त्यांनी महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.