Lonavala : मुंबई येथील एका आश्रमशाळेतील मुलीचा वाॅटरपार्कमध्ये बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळ्यात फिरायला आलेल्या मुंबई येथील एका आश्रमशाळेतील मुलीचा कुमार रिसॉर्टसमधील वॉटरपार्कमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हि घटना आज (बुधवारी) दुपारी सव्वातीन वाजता घडली आहे.

निलू मलेश म्हेत्रे (वय-१७, रा. ६२०, मेगा मजीदजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

  • लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व, मुंबई येथील स्नेह सदन संस्था आश्रमशाळेतील ८७ मुले आणि मुली हे त्यांच्या शाळेच्या बसमधून मंगळवारी लोणावळ्यात फिरायला आले होते. काहीजण येथील कुमार रिसॉर्टसमधील वॉटरपार्कमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी निलू हि वॉटरपार्कच्या कडेला उभी असताना मस्ती करताना तिला धक्का बसल्याने ती वॉटरपार्कच्या पाण्यात पडली होती.

यावेळी ती कशीबशी करत असल्याचे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले असता त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी संस्थेचा बसचालक आणि रिसॉर्टमधील जीवरक्षक यांनी तत्काळ धाव घेत निलूला बाहेर काढून उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता निलू हिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

  • या घटनेची खबर संस्थेचे बसचालक फादर गोएल पँट्रीक (वय-४६, रा. अंधेरी, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती समजताच लोणावळा शहर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. सांगळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. सांगळे हे करीत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like