Lonavala : जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्स पाळण्याची कल्पना

एमपीसी न्यूज – जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना दुकांनासमोर नागरिकांची गर्दी होऊ नये, याकरिता लोणावळा नगरपरिषद आणि दुकानदार यांनी सोशल डिस्टन्स पाळण्याची कल्पना आखत दुकांनासमोर काही अंतरांवर चौकोन तयार केले आहेत. दुकानात खरेदीकरिता येणार्‍या नागरिकांनी त्यामध्ये उभे राहून रांग लावावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोना आजाराचा वेगात वाढत असलेला संसर्ग रोखण्याकरिता देशभरात 21 दिवसांचे लाॅकडाऊन करण्याची घोषणा मंगळवारी रात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या लाॅकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तु खरेदी करताना नागरीक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने कोरोना आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हे सामाजिक अंतर वाढविण्याकरिता लोणावळा नगरपरिषदेने बाजारपेठेत किराणा मालाची दुकाने, भाजी दुकाने व दुग्धालये यांच्या समोर काही अंतरावर नागरिकांना उभे राहण्याकरिता चौकोन तयार केले आहेत. यामुळे दोन व्यक्तीमध्ये अंतर राखले जाणार असून संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे. लोणावळ्यासह खंडाळा, वलवण, तुंगार्ली, भांगरवाडी आदी भागांमध्ये स्थानिक व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी नागरिकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याकरिता चौकोन तयार केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.