Lonavala : रेकॉर्डवरील गुन्हेगार गावठी पिस्तूलासह ताब्यात

लोणावळा ग्रामीण पोलीसांची कारवाई

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण पोलीसांनी रेकाॅर्ड वरील एका गुन्हेगारास आज शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वरसोली गावाच्या हद्दीत पिस्तूलासह त‍ाब्यात घेत अटक केली.

वसीम सलाउद्दिन चौधरी (वय 21, रा. वरसोली लोणावळा) असे या आरोपीचे नाव आहे. वसीम हा त्याच्या वरसोली येथील राहत्या घरी पहाटेच्या सुमारास येणार असल्याची गुप्त माहिती रात्र गस्तीवर असलेल्या लोणावळा ग्रामीणच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवरे, पोलीस हवालदार कैलास लबडे, पोलीस नाईक अमित ठोसर व पोलीस काॅन्स्टेबल गणेश होळकर यांच्या पथकाने वरसोली गावाजवळ सापळा लावत पहाटे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या वसीमला ताब्यात घेतले.  त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे मोकळी मॅगझीन असलेले पिस्तुल मिळून आले.सदर पिस्तुल व दुचाकी गाडी असा सहा लाख 15 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत वसीमला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी अटक केली.

याप्रकरणी पोलीस नाईक अमित ठोसर यांची सरकारी फिर्याद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार कैलास लबडे  करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.