Lonavala: नांगरगावातील ‘त्या’ पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह

Lonavala: The report of those five people from Nangargaon is negative नांगरगाव येथील एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला दि. 2 जुलै रोजी खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कामशेत येथील बडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज- लोणावळा येथील नांगरगावातील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ महिलेच्या घरातील इतर पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

नांगरगाव येथील एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला दि. 2 जुलै रोजी खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कामशेत येथील बडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांना पूर्वीपासून मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार होते. शनिवारी त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील पाच जणांची तपासणी त्याच दिवशी करण्यात आली होती. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर आणखी चार जणांचे स्वॅब घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

पावसाळा सुरु झाला असल्याने सर्दी, खोकला असे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घरातच थांबावे, गरम पाणी प्यावे तसेच बाहेर जाताना चेहर्‍यावर मास्क लावणे बंधनकारक आहे.

कामानिमित्त बाहेर गेल्यास गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, लहान मुले व वयस्कर व्यक्तींना घराबाहेर जाऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like