Lonavala : अट्टल चोरटा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात

वडगाव न्यायालयाने त्याला 3 आँगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. : theves arrested by Lonavla rural police

0

एमपीसीन्यूज : वाकसई ग्रामपंचायत हद्दीत एका बंगल्यात चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

वसिल सल्लाउद्दिन चौधरी (वय 24, रा. वाकसई, ता. मावळ) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जुलैच्या मध्यरात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान वाकसई गावाच्या हद्दीतील कॅमेलिया सोसायटीमध्ये एका बंगल्याच्या बंद स्लायडींगची खिडकी उचकटून बंगल्यात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने बॅगमध्ये ठेवलेली बारा हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.

याप्रकरणी प्रमजी गड्डा (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संशयित अट्टल गुन्हेगार वसिल चौधरी यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर सापळा रचत रहात्या घरातून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेली रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली.

वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 आँगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोठडीमध्ये चौधरी याने लोणावळा शहरातील लोढा बंगला येथे पाच दिवसापुर्वी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

चौधरी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गावठी कट्टा बाळगणे, चोरी, घरफोड्या, मारामारी असे काही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या पथकातील जितेंद्र दिक्षित, हनुमंत शिंदे, शरद जाधवर, गणेश होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like