Lonavala : ताजे येथील दत्ता केदारी खूनप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – ताजे येथील युवक दत्ता ज्ञानदेव केदारी (वय 32) याचा खून केल्याप्रकरणी ताजे आणि देवले येथील तिघांना लोणावळा ग्रामीण पोलीसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली.

सोमनाथ बाळू कोरडे (वय 22, रा. ताजे, मावळ), प्रशांत शांताराम आंबेकर (वय 21, रा. दत्त मंदिराजवळ देवले, मावळ) आणि प्रविण लक्ष्मण गोणते (वय 21, रा. भैरवनाथ मंदिराजवळ देवले, मावळ) या तिघांना या खूनप्रकरणी अटक केली आहे.

  • याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरडे आणि केदारी यांचे भांडण आहे. या भांडणातून सहा महिन्यापुर्वी केदारी यांनी कोरडे यांच्या कुठुंबातील एकाचा खून केला होता. या पूर्व वैमनस्यातून सोमनाथ कोरडे आणि त्याच्या मित्रांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास औंढे मळवली रोडवरील देवले खिंडीतून दत्ता केदारी हा दुचाकीवरून घरी जात होता. यावेळी त्याची दुचाकी त्याच्यावर तलवार आणि कुर्‍हाडीने वार करत गंभीर जखमी करुन त्याचा खून केला.

याप्रकरणातील अन्य सूत्रधारांचा पोलीस शोध घेत असून त्यांच्यावर देखील कटाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पूर्व वैमनस्यातून खूनाच्या दोन घटना घडल्याने ताजे गावात भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.