Lonavala : लाॅकडाऊनमुळे भारुड मंडळांवर उपासमारीची वेळ

Time of famine on Bharud circles due to lockdown

एमपीसीन्यूज : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आल्याने नाट्यरुपी भारुड भजनातून लोकजागृतीचे काम करणार्‍या भारुड मंडळांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पुणे जिल्ह्यात 50 ते 55 भारुड मंडळे असून प्रत्येक मंडळात किमान चाळीस ते पंन्नास लोक काम करतात. लाॅकडाऊनमुळे गावांच्या जत्रा, सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने भारुड भजने बंद झाली.

याचा परिणाम या भारुड मंडळाच्या दैनंदिन अर्थकारणावर झाला आहे.

मागील दोन ते तिन महिन्यांपासून ह्या सर्व मंडळींच्या हातांना काम नसल्याने सध्या त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मावळ तालुक्यातील ओझर्डे, कल्हाट तसेच पवन व आंदरमावळातील काही गावांमधील भारुड भजने प्रसिध्द आहे.

या लोककलावंताना महाराष्ट्र शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अखिल पुणे जिल्हा नाट्यरुपी भजनी भारुड कलाकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.