Lonavala: मावळ तालुक्यातील 31 पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी

Lonavala: Tourists banned at 31 tourist spots in Maval taluka यावर्षी देशात व राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई-पुण्यासह मावळात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून मावळ तालुक्यातील 31 ठिकाणे पर्यटकांकरिता बंद करण्यात आली असल्याचा आदेश मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी जारी केला आहे.

मावळ हा निसर्गसंपन्न तालुका असून पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता लोणावळा-खंडाळा या शहरासह आंदर मावळ व पवन मावळातील डोंगरदर्‍यांमध्ये जात असतात.

यावर्षी देशात व राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई-पुण्यासह मावळात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मावळ तालुक्यातील खालील ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेली ठिकाणं

टाकवे बु, फळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, वहानगाव, कुसवली, बोरवली, डाहुली, सावळा, कुसूर, निळशी, खांड, र‍ाजमाची किल्ला, फणसराई, उधेवाडी, जांभवली, भुशी धरण व परिसर, पवना धरण व परिसर, तुंगार्ली धरण व परिसर, राजमाची व मंक्की पाँईट खंडाळा, घुबड तलाव व ड्युक्स नोज कुरवंडे, घोरावडेश्वर डोंगर, एकविरा मंदिर वेहेरगाव, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापुर, तुंग व तिकोना हे किल्ले, आंबेगाव येथील धबधबा, दुधिवरे येथील प्रति पंढरपूर मंदिर, टायगर पाँईट, लायन्स पाँईट व शिवलिंग पाँईट लोणावळा.

ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहे. याठिकाणी कोणीही पर्यटक जाणार नाहीत य‍ाची खबरदारी घेत आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यावर केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम 2005, भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्याचे आदेश प्रांत अधिकारी शिर्के यांनी मावळ तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.