Lonavala : ‘एक्सप्रेस वे’वर खंडाळा घाटात अवजड वाहन सरकल्याने वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई एक्सप्रेस वे’वर मुंबईच्या दिशेने अवजड जाँब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने अवजड जाँब घेऊन निघालेला ट्रेलर (एमएच 46 एच 0788) हा खंडाळा घाटातील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच सरकला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या तिन्ही लेन बंद झाल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता.  या ठिकाणी ट्रेलर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.