Lonavala : सलग सुट्टयांमुळे ‘एक्सप्रेस वे’वर वाहतूककोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – शनिवार, रविवार, होळी, धुलिवंदन अशा सलग सुट्टयाांमुळे फिरायला जाणार्‍यांची संख्या वाढल्याने ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर भल्या पहाटेपासून वाहतूककोंडी झाली आहे. घाट परिसरात अतिशय संथ गतीने वाहने पुण्याच्या दिशेने येत असल्याने दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहे.

शासनाने सरकारी कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा केल्याने दर शनिवार व रविवार आता सरकारी कार्यालये बंद राहणार आहे. या दोन सुट्टयांसोबत होळी व धुलिवंदनाची देखिल सुट्टी असल्याने सलग सुट्टयांनिमित्त फिरायला जाण्याचे नियोजन करुन पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांमधून फिरायला घराबाहेर निघाल्याने ‘एक्सप्रेस वे’वर वाहतूककोंडी झाली आहे.

खोपोली फुड माॅल ते अमृतांजन पुल दरम्यानच्या घाट परिसरात संत गतीने वाहने घाट चढत आहे. महाबळेश्वर, कोल्हापुर, सांगली, पंढरपुर, तुळजापुर, लोणावळा तसेच कोकण व गोवा परिसरात जाणारे पर्यटक देखिल कोल्हापुर व सातारा मार्गे जाण्याला पसंती देत असल्याने या सर्व वाहनांचा लोंढा एक्सप्रेस वेवर वाढला आहे. कामानिमित्त घरांबाहेर पडणार्‍या नागरिकांनी वाहतूककोंडीचे ग्रहण ध्यानात ठेवून वेळेचे नियोजन करुनच बाहेर पडावे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.