Lonavala : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर काॅईल पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खालील चढणीवर पुण्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रेलरवरुन काॅईल रस्त्यावर पडल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

ही काॅईल बाजुला करण्याकरिता वाहतूक थांबविण्यात आल्याने पुण्याकडे येणार्‍या मार्गावर चार ते पाच किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सदर काॅईल व अपघातग्रस्त ट्रेलर बाजुला करण्याचे काम सुरु आहे. सकाळच्या वेळेत द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने सुट्टयांचे नियोजन करुन घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.