Lonavala : शिवसेनेच्या वतीने लोणावळ्यात वृक्षारोपण

Tree planting in Lonavla on behalf of Shiv Sena

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळामुळे महाकाय वृक्ष पडून निसर्गाची मोठी हानी झाली आहे. या  पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानुसार लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने रायवुड उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपन मोहिम हाती घेतली आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचे वाटप केल्याचे लोणावळा शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, महिला जिल्हासंघटक शादान चौधरी, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, उपतालुकाप्रुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्लै, कल्पना आखाडे, सुभाष डेनकर, जयवंत दळवी, शाम सुतार, तानाजी सुर्यवंशी, संजय भोईर, मनेष पवार, मनिषा भांगरे, सुरेखा देवकर, उर्मिला शर्मा, उल्हास भांगरे, कमर अन्सारी, संजय शिंदे, मुबीन इनामदार, रविंद्र टाकळकर, मोहन मल्ला आदी शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.