Lonavala: रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने शहरात व ग्रामीण भागात वृक्षारोपण

Lonavala: Tree planting in urban and rural areas on behalf of Rotary Club of Lonavala रोटरी क्लबच्या वतीने माणगाव तालुक्यातील विळागाव येथील माध्यमिक शाळेला दोन संगणक व राजमाची ग्रामस्थांना पाण्याचा पंप भेट देण्यात आला.

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने निसर्ग संगोपनासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात वृक्षारोपण करत जिल्हा परिषद शाळा औंढे, अ‍ॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल तसेच वेहरगाव येथील तरुण मंडळ या परिसरातील विविध शाळा व संस्था यांना झाडांचे वितरण करण्यात आले.

यावेळी रोटरी अध्यक्ष उदयसिंग पाटील, रवींद्र कुलकर्णी, जयवंत नलावडे, आशिष मेहता तसेच जेष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तिखे, क्लब महिंद्राचे अहमद सिराज व सतीश हे उपस्थित होते.

सोबतच रोटरी क्लबच्या वतीने माणगाव तालुक्यातील विळागाव येथील माध्यमिक शाळेला दोन संगणक व राजमाची ग्रामस्थांना पाण्याचा पंप भेट देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like