Lonavala : ट्रेकिंग पलटण ग्रुपची मोरगिरी गडावर ट्रेक-मार्ग स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज- ट्रेकिंग पलटण ग्रुपच्या सदस्यांनी रविवारी (दि. 22) लोणावळ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला मोरगिरी गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत, ज्या ठिकाणी ट्रेकर्सची दिशाभूल होऊ शकते, तिथे मार्गदर्शक कापडी पट्ट्या (रिबन), जलरोधक कागदी फलक, बाणाच्या आकाराच्या दगडी खुणा यांचा वापर करून ट्रेक मार्ग सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

लोणावळ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला मोरगिरी हा तसा ऑफबीट ट्रेक. त्यामुळे सामान्य पर्यटकांना तसा अपरिचित . या गडावर फारसे ट्रेकर्स येत नसल्याने ट्रेक मार्ग अस्पष्ट आहेत. शिवाय अनेक ढोरवाटाही आहेत. यामुळे ट्रेकर्स भरकटण्याची शक्यता अधिक. विस्तीर्ण पठार आणि घनदाट झाडी यामुळे अनुभवी ट्रेकर्स सुद्धा मार्ग चुकू शकतात. हे लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला. तथापि गडावर जातांना स्थानिक वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक असल्याचे पलटणच्या सदस्यांनी सांगितले.

या कार्यात ट्रेकिंग पलटण ग्रुपच्या परशुराम भांगरे, नितीन कुलकर्णी, संदीप चौधरी, हेमंत पाटील, संदीप जाधव, अमोल गोरे, ललित बागल, पवन पाटील, नितीन बागले, सचिन शिंदे, संजय ववले आणि प्रा डॉ सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला. नियोजनात प्रा डॉ अनिता धायगुडे आणि प्रा. डॉ संदीप गाडेकर यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.