Lonavala : खंडाळा घाटात ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी नाही

0

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक आज सायंकाळी उलटला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

लोणावळा खंडाळा परिसरात आज बुधवारी दुपारनंतर दिडतास जोरदार पाऊस झाल्याने भिजलेल्या रस्त्यावरुन मुंबईकडे जाताना उतारावर एक ट्रक उलटला.

आज बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कसलिही दुखापत झाली नाही. मात्र, ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने काहीकाळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

HB_POST_END_FTR-A2
You might also like